आपले स्वागत आहे

सुपर वूमन पॉवर क्लब

सुपर वूमन अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र

या प्रोजेक्टमध्ये ज्या महिला येणार आहेत. त्या महिलांचा ‘बेस्ट वुमन इन महाराष्ट्र’ या नावाने सन्मान केल्या जाणार आहे. राज्य शासन आणि मुक्ताई सेवा दल फाउंडेशन, सुपर वुमन इन इंडिया यांच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन केलं जाईल. राज्यातल्या सर्वोच्च चार व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र, गौरव गाथा असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. राज्य शासनाची मोहर त्यांवर असल्यामुळे त्या पुरस्काराला निश्चितच अधिक महत्त्व प्राप्त असणार आहे.

मिशन आणी व्हिजन

भारत देश हा चळवळीचे केंद्र राहिलेला देश आहे. त्या झालेल्या चळवळीमध्ये महिलांचे खूप मोठे योगदान असणार आहे. महिलांचं खूप मोठं योगदान असणाऱ्या या भारत देशामध्ये आजही आपण भारत माता की जय असे अभिमानाने म्हणतो. याच भारतामध्ये असणाऱ्या अनेक भारत मातेला त्यांचं वेगळेपण आहे, त्यांनी समाजासाठी काय केले पाहिजे, अशांना आपण एकत्रित करून एक देश पातळीवरची चळवळ, सामाजिक उन्नतीसाठी आपण उभी करणार आहोत.