मिशन आणी व्हिजन

35870734_8366986-removebg-preview

भारत देश हा चळवळीचे केंद्र राहिलेला देश आहे. त्या झालेल्या चळवळीमध्ये महिलांचे खूप मोठे योगदान असणार आहे. महिलांचं खूप मोठं योगदान असणाऱ्या या भारत देशामध्ये आजही आपण भारत माता की जय असे अभिमानाने म्हणतो. याच भारतामध्ये असणाऱ्या अनेक भारत मातेला त्यांचं वेगळेपण आहे, त्यांनी समाजासाठी काय केले पाहिजे, अशांना आपण एकत्रित करून एक देश पातळीवरची चळवळ, सामाजिक उन्नतीसाठी आपण उभी करणार आहोत. त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल. या प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या आणि काहीतरी हटके करणाऱ्या अनेक महिला एकत्रित येणार आहेत. त्या महिलांनी स्वतःचे व्यक्तिमत्व, कुटुंबाचे भवितव्य, सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक हित जपल्या जावं या संदर्भामध्ये मुक्ताई सेवा दल फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाची आम्ही सुरुवात करत आहोत.पाच हजार महिलांचे जाळे आम्हाला

पुढच्या पाच वर्षांमध्ये विनायचे आहे. पुढे याच पाच हजार महिला या देशाचे भवितव्य ठरवतील. हा त्या मागचा उद्देश आहे.एक महिला कधी लक्ष्मी , सरस्वती असते तर कधी राणीलक्ष्मी, सावितीबाई फुले असते. ती सृष्टीला तारणारी आदिमाया असते. तर कधी सामजिक तारणहार म्हणून ती पुढे येते. त्या आदिमायेला जर योग्य दिशा दिली. तर अजून चांगले घडत राहील. आम्ही जी मेंबरशिप फीस घेत आहोत त्या मेंबरशिप फिसच्या माध्यमातून त्याच महिलेला उभे राहण्यासंदर्भातली साधनसामुग्री उपक्रमा संदर्भातला खर्च आदी त्यामध्ये असणार आहे. ज्या महिला आहेत त्या केवळ फी नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून योगदान देत या चळवळीचा भाग होऊ शकता.