तुमच्या सर्वांगीण विकासासाठी, तुमच्या बौद्धिक वाढीसाठी आम्ही बारा महिन्यात मोठे बारा कार्यक्रम घेणार आहोत. ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असणारे मान्यवर आपल्याला थेट येऊन आपल्याशी बोलणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या मान्यवर व्यक्तीला आपल्याला बोलण्याची त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची मोठी संधी मिळणार आहे. ज्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व फुलण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.